❤️ Romantic प्रेमाचे स्टेटस
प्रेम ही भावना शब्दांमध्ये मांडणे सोपे नसते, पण योग्य शब्द मिळाले तर ती भावना अधिक सुंदर वाटते.या पोस्टमध्ये तुम्हाला हृदयाला स्पर्श करणारे आणि मनात घर करणारे रोमँटिक प्रेमाचे स्टेटस मिळतील. प्रत्येक ओळ तुमच्या खास व्यक्तीला समर्पित करण्यासाठी तयार आहे. प्रेमातले गोड क्षण, आठवणी आणि भावना व्यक्त करण्यासाठी हे स्टेटस नक्कीच उपयोगी ठरतील. सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी आणि आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी हे स्टेटस परफेक्ट आहेत. तुमच्या नात्याला अधिक मजबूत आणि खास बनवण्यासाठी योग्य शब्दांची साथ मिळेल. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाहीत, ती एक सुंदर जाणीव आहे. ही जाणीव व्यक्त करण्यासाठी इथले प्रत्येक स्टेटस खास निवडलेले आहे. तुमच्या मनातील भावना जर व्यक्त करायच्या असतील तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, प्रेमाच्या या सुंदर शब्दांचा आनंद घ्या आणि आपल्या प्रिय व्यक्तीसोबत शेअर करा. ❤️
कधी येईल तो दिवस तु एका
क्षणात समोर येशील आणि,
म्हणशील मी
तुझ्याशिवाय जगुच शकत नाही ????…..
---
प्रेम म्हणजे brekup नंतर हि आपल्या
जोडीदारयाला जाणूनबुजून कॉल करणं
आणि ohh sorry ha…
तुला चुकून Phone लागला
मला सवय झाली होती ना …
असं म्हणणं
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXU3eDDGKYf9N3Fk4CYPxgrrm5F67uvI2wj_305ud6kWZQYcZPAMQA8ADAUtCAFcXQjYeGvCuhGSlrb5jQ_-Db4nyApS99WRM7c5Ryg_mt_H81r4nBS8DxoUPv_V-SDZ0kjjRm4TmAA8mLGnupBc-FPyNbKowPY48QyfmPTq6PTjbi0yRAv2ZoFbqpGfWQ/s1080/love_status_marathi_blog.jpg | Romantic Love Quotes]
---
अजूनही जीवन जगत आहे,
कारण माझा श्वास आहे तू,
तू जरी माझी नसलीस तरी,
माझं पहिलं ❣️ प्रेम आहे तू.
---
काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात,
त्यांना तुमच्या भूतकाळाशी
काही देणंघेणं नसतं,
कारण त्यांना तुमच्या
भविष्याचा भाग व्हायचे असते.
---
जर कधी आयुष्यामध्ये
तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले…
तर, मग दुसरं प्रेम निवडा,
कारण,
जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर..
दुसरे प्रेम झालेच नसते !
---
जर आयुष्य असेल तर,
तुझ्या सोबत असू दे.
आणि,????
जर मृत्यू असेल तर,
तुझ्या अगोदर असू दे.????
---
माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.
---
माणूस मनापासून खुश फक्त,
त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..
ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj3x5N4AxKqYB9ktG9S7mG9grXMuJSKzrQ44955aVMxmHnJo2fBEisXycW5TwDFYrxIIfOPMiivzmGuY6Yaie62pTtSe0dxudw28yRScjLG6Dty9kZkHAbu6yNvyQ9Ynj4dDul4SGC9cIBAqSUFWRUDCh8faQvxxrEbaNvJBsndpfwYdTH7FA6t8VrNDk7U/w640-h640/romantic_love_images.jpg]
---
कोणाला मिळवणे याला
प्रेम ???? म्हणत नाहीत तर
कोणाच्या तरी ❣️ मनात आपली
जागा निर्माण करणे म्हणजेच
तर खरे प्रेम.????
---
प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार……
---
माहित नाही की तुझ्यात
असं काय वेगळं आहे..
तू असलीस की वाटतं माझ्या
जवळ सगळं आहे..!
---
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात ???? तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे
---
कितीही रुसलीस कितीही
रागावलीस तरी
माझं तुझ्यावरच
प्रेम ???? कमी होणार नाही….
---
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_PW4Fu7MxOhs-WXe41zRMzGF-El-6m8SegqkwgO8Hzehqqdy4-HILM5fMvlA6_SNc6RS2Gvgtq0vM5oDvgI5l9mL4hlfIbWT6Wpe1IQ3LsKEb3QqAgFMT3Ic5UAh8l-_S2Kl02cA5JLnIY1jIpbX33XuX_EZU3Ti5nhx731s4Xd-bG_gDFcv7UvlXhYeK/s1080/romantic_love_images_quotes.jpg]
---
सुंदर ???? दिसतेस म्हणून तुला सारखं
बघावंसं वाटतं,
गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या
हसावसं वाटतं,
मधुर ???? आवाज तुझा म्हणून सारखं
तुला बोलावसं वाटतं,
वेड लावणारं वागणं तुझं
म्हणून सोबत ???? तुझ्या राहावंसं वाटतं.
---
ओढ म्हणजे काय ते,
जीव लागल्याशिवाय समजत नाही.
विरह म्हणजे काय ते,
प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.
प्रेम म्हणजे काय ते,
स्वतः केल्याशिवाय समजत नाही.
---
एखादयाशी हसता हसता
तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी
अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या
ह्रदयात राहता आलं पाहिजे…..
---
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते……
---
तुला हसवण्यापेक्षा,
तुला रडवणे, मला पसंत आहे..
मिठीत घेऊन तुला समजावण्यात,
एक वेगळाच आनंद आहे !
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg7YSLmRkteJ5BIoHh14d6nBu3Iw002xcKtZ9t99ezwwEhhYMcKeASUWVzSaacDas_22Ms00fxoKrGGgtMQakxvCudAsE0m_N_rU-tdKLKvID5ttLImRN6pVXLWTIznYq_6o51aEqjPyj0n5rpU5MhFq8GoYYWKeROMQdG82GIK3GmhnvcfvZYWoW7xIEd7/s1080/romantic_love_images_quotes.blog.jpg]
---
तुझ्यासाठी जीव देणारे तुला
खूप भेटतील
पण माझ्या सारखा जीव लावणारा
एक पण नाही मिळणार ????…
---
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,
कधी तुझी सावली बनून,
कधी तुझे हसू बनून,
आणि कधी तुझा श्वास बनून.
---
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
---
मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,
आपल्या माणसाबरोबर नाही.
कारण,आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,
तर ‘जगायचे’आहे.
---
तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी,
आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी,
आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू,
कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू,
माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू…..
---
तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही….!!
---
या जगात फक्त दोनच माणसे
पूर्णपणे सुखी राहू शकतात,
ज्याला त्याचे ✔️ खरे प्रेम मिळाले तो.
आणि ज्याला प्रेम म्हणजे काय
आहे हेच माहित नाही तो ????.
---
तुझा होतो तुझा आहे,
आयुष्यभर तुझाच राहीन..
तु परत यायचं वचन दे,
मी उभा जन्म वाट पाहीन.
---
तुझा राग आहे ना,
तो मला खूप आवडतो..
म्हणूनच कधी कधी,
तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.
---
एकतर्फी प्रेम स्टेटस मराठी
रोज रोज त्रास होतो
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
कधी खेळ हा थांबेल
संदेशाद्वारे बोलण्याचा.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhLExbuiz2bQkLrLIwODIAA7QXR0g8XIbbW-ytODDBHpos-G4AIAL3jbDMvRVjwQ9lZI6xjfbD4uwnvV2sYbatrBXX36-xMRtegJcHZfpVPO4hu0yHRHd7FqwvUACcnOR2DFCkEbV_LKloWREkMIpYZbqCilbO9mmw3DsNA_TI7eBdoZYEJjTxdxlDujXmz/s1080/romantic_love_images-love.jpg]
---
माझी आवड आहेस तू,
माझी निवड आहेस तू,
कसं सांगू तुला पिल्लु,
माझं पहिलं प्रेम आहेस तू.
---
गालावर ???? खळी नको तिच्या,
फक्त जरा हसरी मिळावी..
चंद्राइतकी ???? सुंदर नकोच,
फक्त परी ???? लाजरी मिळावी.
---
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,
मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,
एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.
---
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल..
जर तू माझ्याशी प्रेम करशील
तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील
तर मी तुझ्या मनात असेल……
---
आयुष्यभर हसवेन ???? तुला
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी
पण मला कधी सोडून जाऊ नकोस ????.
---
एक गुलाब म्हणतो ???? I love You
एक स्माईल म्हणते I like You
एक रिंग – म्हणते I marry-You
पण माझं एक छोटस Status म्हणतं.
खडूस i Really_miss_You
---
मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू …
---
गोपिका कितीही सुंदर असूदेत;
मला मात्र माझी रुसणारी
राधाच आवडते.
---
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला ???? जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः ???? रडून तुला हसवेल…..
---
प्रेयसी लोकल सारखी असावी
नेहमी लेट येणारी
पण तिच्याशिवाय option नसणारी…
---
तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस
---
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे..
पण तुला चोरून पाहण्यात एक,
वेगळीच मजा येते….
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg_XeSgN2TVHKbRQMKe7ewmbcpCa6UvEy3YCBQ0Ap_VL8nufonMicrd8DTfZVujAeFdwIQCZGX4GL0aXNADOSJDgQf4Aldb65LJ1DLWetdWu0K4NQsM41-hguolukwdZpxQbzexGLVClftJ4c-aBXZcfUoJlphFiPSo5XKGHUcBPrPtjD94_z7dju-CPG9P/s1080/romantic_love_images-love-blog.jpg]
---
प्रेम म्हणजे
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.
---
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही
काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.
---
वेळ लागला तरी चालेल,
पण ???? वाट तुझीच पाहीन,
तू विसरली तरी चालेल,
पण मी नेहमी तुझाच ???? राहीन.
तुझाच एक प्रेम वेडा !????
---
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
---
प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.
---
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे,
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे.
---
प्रेम कधी पहिलं नसतं,
आणि कधी शेवटचं नसतं,
कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,
कारण प्रेम फक्त प्रेम असतं.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgRPbi8_FOUcPuS7e57psXC06x5TyOtJ6lmKCp9RCQNAjF75JSu1cVMG0WhplXwv0wGuXwqNQcJJ-v9Wc4vPAia_Y7O_A-y6GH9SQmXMAiirIixKt8bY-Fc0VVeDGzX_XzDA3xlde42qINK3p_jWTnKBwV1oMakF7HFK6aLGKzuFTwCOy5mRSJkDvsfRvoc/s1080/romantic_love_images-blog.jpg]
---
मराठी प्रेम स्टेटस
जीवनाच्या वाटेवर चालतांना,
मी जगेन अथवा मरेन,
आयुष्याच्या शेवट पर्यंत,
मी तुझ्यावरच प्रेम करेन.
---
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे
खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच राहवत नाही.
---
मी “तुझी” आहे का नाही..
“हे मला नाही माहीत..”
पण,????
“तू” “फक्त” आणि “फक्त”
“माझा” आहेस हे लक्षात ठेव ????”.
---
तुझ्या कुंकवाशी माझं नातं
जन्मोजन्माचं असावं
तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालताना
तू हळूच लाजवं
कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा…
---
प्रेमाची गोडी ही मनाची शांती असते,
एकमेकांच्या आठवणीत सापडते आपली भेट,
मनांच्या संगमात उमलते नात्यांची फुले,
आणि प्रेमाचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो.
---
तुझ्या प्रेमाचा इशारा मिळाला की जग जिंकल्यासारखं वाटतं,
तुझ्या साथीचा प्रत्येक क्षण सुवर्णसंधी वाटतो,
हातात तुझा हात असला की भीतीही दूर पळते,
आणि स्वप्नांनाही नवी उंची मिळते.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyZhsUvnsUvJDsvtZe7Rb-pDvz8A-z1dqjbkTKnnYMneL_qcNS4foX0g0KLC6JPQKmGskBVgLNVhC0C53S1zf9ua6-0YWTtDHzdWulfJgDUF21siFUtLfkWDCiDYuq7DlpDoKIyt4cJW10ICH87TwkbAhacydIcSttaWycAKs5xrHRwBaVBZ8LGplzLSrH/s1080/red_rose_image.jpg]
---
आपल्या प्रेमाची कहाणी ताऱ्यांसारखी अमर,
अनंत आकाशात सदैव चमकणारी,
रात्रीच्या अंधारातही उजळणारी,
आणि काळाच्या पलीकडे टिकणारी.
---
तुझा स्पर्श विश्वासाची उब देतो,
तुझी नजर मन शांत करते,
तू सोबत असलीस की जग स्वर्ग वाटतो,
आणि प्रत्येक क्षण खास बनतो.
---
प्रेम म्हणजे फक्त भेटणं नाही,
तर एकमेकांसाठी जगणं आहे,
दुखात साथ देणं आहे,
आणि आनंदात मनापासून हसणं आहे.
---
तुझ्यासाठी माझं हृदय नेहमी धडधडत राहील,
तुझ्या प्रेमाची गाणी श्वासांत साठवीन,
तुझ्या आठवणींची ज्योत जपीन,
आणि आयुष्यभर तुलाच मान देईन.
---
आत्म्याचं प्रेमाने झालेलं मिलन,
जगातील सर्वात सुंदर गीत आहे,
मनाच्या तारा छेडणारं,
अनंत काळ गुणगुणत राहणारं.
---
प्रेम म्हणजे नात्याची मिठास,
एकमेकांसाठी असण्याची खासियत,
तुझ्या आठवणीत धडधडणारं हृदय,
आणि मनात साठलेली अनंत आपुलकी.
---
तुझ्यासोबत चालताना वेळ थांबते,
क्षणही मौल्यवान वाटतात,
तुझ्या पाऊलखुणा मार्गदर्शक होतात,
आणि आयुष्याला दिशा मिळते.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh5Za3Kz1wfnks__UNb8PHeNMG2QUbGu2Syq_OtKSQ7fb70MHmm28J40_5HgVacFBrAuiOCAlImCjVMJRcBVrPZzvNDJ7cav-FLT8pr3O8F-Nf6JXDeMfB4al5MtMQawZOdC6iFWZCVWLazTZ5UHaq9y_2zxqbj3UGoc9zdtKfnLRusDm2HJfjpflrFZpvt/s1080/romantic_couple_image.jpg]
---
तुझ्या साथीने जीवन सुरांसारखं गुंजतं,
प्रत्येक दिवस गाण्यासारखा वाटतो,
तू दूर गेलीस की विरह छेडतो,
आणि मन एकाकी होतं.
---
तू माझ्या प्रत्येक स्वप्नात आहेस,
प्रत्येक विचारात वसली आहेस,
तू नसलेल्या जगाची कल्पना नाही,
कारण तूच माझं संपूर्ण विश्व आहेस.
---
तुझ्या प्रेमाने इच्छा पूर्ण झाल्या,
जसा चंद्राला मिळाला प्रकाश,
तू नसताना अंधारच अंधार,
तू असलीस की जीवन उजळून निघतं.
---
प्रेमाच्या वाटेवर तुझी साथ,
प्रत्येक पाऊल उत्सवासारखं,
तुझ्या अभावात एकांत सागर,
आणि मन हरवलेलं किनाऱ्यासारखं.
---
तुझे स्पर्श, तुझी नजर,
तुझ्या प्रेमाची मिठी खास,
यातून मिळाला जीवनाचा अर्थ,
आणि प्रेमाचा खरा विश्वास.
---
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण उत्सव,
हास्याने भरलेला आनंद,
तू दूर गेलीस की वेळ थांबतो,
आणि प्रत्येक क्षण वर्षासारखा वाटतो.
---
तुझ्याशिवाय आयुष्य कोरडं पान,
तू आहेस वर्षावाची धारा,
जीवनाला देते अर्थ नवा,
आणि मनाला देते सहारा.
---
[image:https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyZhsUvnsUvJDsvtZe7Rb-pDvz8A-z1dqjbkTKnnYMneL_qcNS4foX0g0KLC6JPQKmGskBVgLNVhC0C53S1zf9ua6-0YWTtDHzdWulfJgDUF21siFUtLfkWDCiDYuq7DlpDoKIyt4cJW10ICH87TwkbAhacydIcSttaWycAKs5xrHRwBaVBZ8LGplzLSrH/s1080/red_rose_image.jpg]
---
प्रेमाचा संग्राम तू आणि मी,
साथीदार आयुष्यभराचे,
तुझ्या सोबतीने जिंकू जग,
स्वप्नांच्या प्रत्येक लढाईचे.
---
तू माझ्या हृदयाची राणी,
स्वप्नांची साक्षात्कार,
तुझ्यासाठी माझं प्रेम,
अखंड, अविरत, अजरामर.
---
तिच्याच साठी मी, रोज एक कविता
करावी तिने ती माझ्याच समोर वाचावी,
अन वाचून झाल्यावर, मला
पाहुन…हळूच ती लाजावी….
---
ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी, डोळ्यांतून अश्रू ओघळले
तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.
---
मी काहीही बोलत नाही याचा अर्थ
Mi मी चुकलोय असा नाही,
मी तुझ्यासाठी शांत आहे,
कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.
---
खरं तर मी तुला लहाणपणीच
मागायला पाहीजे होतं गं !
कारण, थोडा वेळ रडलो की
घरचे जे पाहीजे ते, आणून तरी देत होते.
---
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.
---
नदीला या काठ दे..
वाटेला माझ्या वाट दे..
अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,
आता फक्त आयुष्यभराची साथ दे.
---
प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.
---
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि
प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते……
--
तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं,
तुला हसतांना पाहिलं ना कि
बस पाहताच राहू वाटतं,
कधी बेधुंद कधी बेभान वाटतं,
खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं.
---
ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,
काही सांगायचंय तुला,
एकही क्षण ही करमत नाही मला..
म्हणून ठरवलंय आता,
बायको बनवायचंय तुला.
---
जेव्हा आपली आवडती व्यक्ती,
आपल्याशी न बोलता राहू शकते..
या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते,
तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.
---
प्रेम तुझ्यावर खुप केलं,
पण तुला सांगु शकलो नाही..
तु एकटी असतांना सुद्धा,
प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.
---
माझं प्रेम,तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं.
तुझ्या नंतरही कुणी नसेल,
जो पर्यंत, श्वासात श्वास आहे,
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल…..
---
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,
मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,
मनातले सारे गुज सांगण्यासाठीहवे असते कुणीतरी,
फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.
---
“फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…..”
---
तिला वाटत असेल एवढा कसा बदलोय मी
अग वेडे तुटलेल्या फुलाचा रंग बदलणारंच ना..
---
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
---
वेडया मनाला माझ्या, तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही..
तू, तू अन फक्त तूच, तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही..
अबोल हि प्रीत माझी, तुला का कधीच कळत नाही..
अन वेडे हे मन माझे, तुला पाहिल्याशिवाय काही राहवतच नाही.
---
तुझ्या चेहर्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे..
म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे..
तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे..
मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे…..
---
त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,
मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..
मला म्हटली चल टॉस करूया,
छापा पडला तर तु माझा आणि
काटा पडला तर मी तुझी.
---
तो चंद्र नकोय गं मला,
फक्त तुझी शीतल सावली दे..
हे जग नकोय गं मला,
फक्त तुझ्यातलं माझं जग दे..
स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी,
पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..
---
तुच माझी रूपमती,सर्व मैत्रिणीत
तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी
तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु
माझी सौभाग्यवती ..
---
प्रेम करायचं म्हणाल तर,
कुणाशीही जमत नाही.
मनासारख्या जोडीदारा शिवाय,
संसारात मन रमत नाही.
---