Type Here to Get Search Results !

Happy Vasubaras Wishes : वसुबारसेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, पाठवा हे शुभेच्छा संदेश Status व SMS, Instagram, Facebook आणि Whatsapp वर तुमच्या प्रियजनांना....

 
https://www.manatlyabhavna.in/
Happy Vasubaras 2025 Wishes In Marathi : दिवाळीची सुरुवात वसुबारस पूजेने होते. यादिवशी गाय वासराची पूजा केली जाते. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागतो व अभ्यंग स्नान देखील या दिवशी करून दिवाळीची उत्साहात सुरुवात केली जाते. चला तर मग वसुबारसेच्या मंगलमय शुभेच्छा द्या तुमच्या परिवाराला फ्रेंड्स आणि प्रियजनांना...
वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवा वसुबारसेला लागला जातो. यादिवशी अभ्यंगस्नान करून गाईची पूजा केली जाते. आपल्या गाय वासराला गोठ्यातील बैलांना सजवण्यात येते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र शहरात देखील गाईंची पूजा देवघरात गाईची मूर्ती ठेवून केली जाते. यावेळी गाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवता. तसेच आपल्या घरात भरभराट व्हावी यासाठी देखील शेतात राबणाऱ्या दुभत्या जनावरांना यादिवशी औक्षण करून मान दिला जातो. आपली संस्कृती कृषिप्रधान असल्याने बळीराजाच्या मित्रांना म्हणजेच गायी बैल यासारख्या जनावरांची वसुबारसेला पूजा करतात. चला तर मग दिवाळीची सुरुवात करूया वसुबारसेच्या हटके मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून आपल्या प्रियजनांना...              दिन दिन दिवाळी
    गाई म्हशी ओवाळी
    गाई म्हशी कोणाच्या
    प्रिय बळीराजाच्या
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!  
 
    गाई वासराला पुजूया
    संस्कृती आपली जपूया
    वसुबारसेला सर्वांनी
    मिळून दिवाळी साजरी करूया
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!
 
गोहत्यां ब्रह्महत्यां च करोति ह्यतिदेशिकीम्।यो हि गच्छत्यगम्यां च यः स्त्रीहत्यां करोति च ॥
गोहत्यां ब्रह्महत्यां च करोति ह्यतिदेशिकीम्।यो हि गच्छत्यगम्यां च यः स्त्रीहत्यां करोति च ॥
 
https://www.manatlyabhavna.in/

    वसुबारसेच्या दिवशी
    कुटुंबावर तुमच्या राहो
    सदैव कृपा, मिळो तुम्हाला
    यश सुख समृद्धी हीच प्रार्थना
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

    गोमातेचे पूजन करतात
    वसुबारसेच्या दिवशी
    दिवाळी साजरी करतात
    आनंदाने मिळुनी एकमेकांशी
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

पावने सुरभि श्रेष्ठे देवी नमोस्तुते सर्व काम दुधे देवी सर्व तीर्थी विशेष
पावने सुरभि श्रेष्ठे देवी नमोस्तुते सर्व काम दुधे देवी सर्व तीर्थी विशेष
 
https://www.manatlyabhavna.in/

    गाई वासराला नैवेद्य पुरणपोळीचा
    सजल्या गाई दिनी वसुबारसेच्या
    पुजले गोमातेला औक्षण करुनी दिवाळीला
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!   

    सुख समृद्धी भरभराट
    घरी येईल तुमच्या
    पूजुनी गोमातेला
    आशीर्वाद घ्या गाय वासराचा
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् । त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे ॥
त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् । त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे ॥
 

    गोमातेचे पूजन
    मातृत्वाचे पूजन
    वसुबारसेचा दिन शुभ
    मंगलमय होवो तुमचा सण
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...!

    संस्कृती परंपरा जपूया
    गोमातेचे पूजन औक्षण
    वसुबारसेला करूया
    वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.