Type Here to Get Search Results !

आठवणीतल्या कविता - Athavanitlya Kavita - Quotes



मी कुठे म्हणालो परी मिळावी !


मी कुठे म्हणालो परी मिळावी ! 
फक्त जरा बरी मिळावी..

नाई, प्रयत्न मनापासून आहेत, 
मग किमान एक तरी मिळावी..

स्वप्नात तश्या खूप भेटतात, 
कधीतरी खरी मिळावी..

हवी हवीशी एक जखम, 
एकदा तरी उरी मिळावी..

गालावर खळी नको तिच्या, 
फक्त जरा हसरी मिळावी..

चंद्रा इतकी सुंदर नकोच, 
फक्त जरा लाजरी मिळावी..

मी कुठे म्हणालो परी मिळावी ! 
फक्त जरा बरी मिळावी..

- मंगेश पाडगावकर.



एकटे एकटे वाटतयं...


आजकाल खूप एकटे एकटे वाटतयं...
भल्या मोठ्या गर्दीतही जणू एकांत भासतंय

कल्लोळ आहे पण सर्व काही शांत वाटतयं 
खूप माणसे आहेत सोबत ओळखीचे 

आणि अनोळखी प्रेम करणारे 
आणि द्वेष करणारे 

बर वाईट मधला फरक जाणणारे 
पण तरी त्यांच्या सहवास दूर जाणवतोय

माहीत नाही काय मन शोधतय 
जुन्या आठवणीत कधी रमतयं 

काही तरी हातातून निसटलेय याच दुःख 
काळजात उठतय 
म्हणून मन कश्यासाठी तरी झुरतंय

आता कसे हे मन हलके करायचं 
कोणाजवळ मनाचं कवाड उघडायच 

बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचंय 
माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर 
तरी मन आज कुणाचा तरी आधार मागतंय




एक नातं आपलं...

आज खूप एकट वाटलं, 
पण सांगायचं कोणाला, 

अस्वस्थ होत होतं मन, 
पण बोलणार कोणासोबत, 

खुप अवघड असतं स्वतःला समजावणं, 
आपलंही मन ओळखणार एक अस्तित्व असावं, 

आपल्याला आपलेपणाची जाणिव करून देणारं, 
निरागस असतं मन, त्याला समजवता देखील येत नाही, 

तुमच्यासोबत असताना पूर्ण जग विसरायला होतं, 
दोन मन जुळली की आयुष्य जगायला देखील बळ येतं, 

नात्यातील ओढ दोघांनाही असावी लागते, 
एकानेच पुढाकार घेऊन नाही जमत कधी, 

प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, सगळं आपलं असावं, 
पण, आपलं सगळं असूनही मन उदास होतं, 
का तर आपल्या सगळ्यात जवळच्या माणसाची सोबत नसते, 

तुम्हाला आयुष्य मानलं आहे, 
आता आयुष्याची सुरुवात आणि शेवट देखील तुम्हीच आहात....!



आयुष्याला द्यावे उत्तर...


असे जगावे दुनियेमध्ये, 
आव्हानाचे लावुन अत्तर, 
नजर रोखुनी नजरेमध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

नको गुलामी नक्षत्रांची, 
भीती आंधळी ताऱ्यांची, 
आयुष्याला भिडतानाही, 
चैन करावी स्वप्नांची..

असे दांडगी इच्छा ज्याची, 
मार्ग तयाला मिळती सत्तर, 
नजर रोखुनी नजरेमध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती, 
कवेत अंबर घेताना, 
हसू असावे ओठांवरती, 
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे, 
आता ये बेहत्तर, 
नजर रोखुनी नजरेमध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही, 
दुनियेतुनी या जाताना, 
गहिवर यावा जगास साऱ्या, 
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही, 
क्षणभर व्हावा कातर-कातर, 
नजर रोखुनी नजरेमध्ये, 
आयुष्याला द्यावे उत्तर...

कवी : विंदा करंदीकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.